सावरकरांच्या भूमिकेशी भाजप द्रोह करतेय- मुख्यमंत्री

यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वा. सावरकरांच्या मुद्दयावर देखील भाष्य केले. 

Updated: Dec 15, 2019, 08:32 PM IST
सावरकरांच्या भूमिकेशी भाजप द्रोह करतेय- मुख्यमंत्री  title=

नागपूर : एक चहावाला देशाचा पंतप्रधान आहे पण ते ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षानेच चहापानावर बहिष्कार टाकावा हे दुर्देवी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. समाजाला न्याय मिळवून देणे हे आपल्या दोघांचे कर्तव्य असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी पत्रकारांना केले. 

निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासन पाळणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. शेतकऱ्यांसाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी त्यांनी स्वा. सावरकरांच्या मुद्दयावर देखील भाष्य केले. लोकांना सतत चिंतेत ठेवा आणि कारभार आटपा अशी स्थिती भाजपाची असल्याचे ते म्हणाले. देश एक राहील हे सावरकरांचे मत आहे. पण तुम्ही त्या मार्गावर चालत नाही. अल्पसंख्यांकाना बाजूला ठेवता. अल्पसंख्यांक सुरक्षित नसतील तर गाठ आमच्याशी आहे असं पंतप्रधानांनी राज्यकर्त्यांना ठणकावून सांगायला हवे होते पण तसे झाले नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

छत्रपतींच्या स्मारकामागे कोणी घोटाळा केला असेल तर निंदनीय प्रकार असल्याचे ते म्हणाले. आमच्याकडे या तक्रारी आल्या आहेत. आम्ही त्यावर कारवाई करु असे ते म्हणाले.