शहरात कचऱ्याचं साम्राज्य असताना नेते पर्यटनाला

आमदार, मंत्री, महापौर आणि नगरसेवकांसह शहरातील नामांकीत उद्योजक अशा 334 जणांचा समावेश आहे.

Jaywant Patil Updated: Mar 24, 2018, 07:27 PM IST
शहरात कचऱ्याचं साम्राज्य असताना नेते पर्यटनाला title=

औरंगाबाद : औरंगाबादला गेल्या काही दिवसांपासून सतावत असलेल्या कचऱ्याच्या समस्येवर समाधान सापडत नसतांना, यासाठी जबाबदार असणारे लोकप्रतिनिधी मात्र सहकुटुंब पर्यटनासाठी अमृतसर, वाघा बॉर्डरला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे राजकरणात एकमेकांचे वैरी असणारी, ही मंडळी सहलीला मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे टाकून गेले. यात खासदार, आजी-माजी आमदार, मंत्री, महापौर आणि नगरसेवकांसह शहरातील नामांकीत उद्योजक अशा 334 जणांचा समावेश आहे.

पर्यटनासाठी निघाल्याचा महापौरांचा दावा

कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावल्यानंतरच पर्यटनासाठी निघाल्याचा महापौरांचा दावा आहे. तर चार महिने आधीच सहलीचं नियोजन झाल्याचं, आयोजकांचं म्हणणं आहे. औरंगाबादचा कचरा प्रश्न विषशे