रस्त्यानं जाणाऱ्या मुलीच्या डोळ्यात तरूणानं टाकली मिरचीची पूड

ठाण्यातला धक्कादायक प्रकार

Updated: May 15, 2018, 09:21 AM IST
रस्त्यानं जाणाऱ्या मुलीच्या डोळ्यात तरूणानं टाकली मिरचीची पूड title=

ठाणे : ठाण्यात रस्त्यानं जाणाऱ्या मुलीच्या डोळ्यात एका तरूणानं मिरचीची पूड टाकल्याची घटना २५ एप्रिलला घडली होती. १६ वर्षाची तरूणी चरई इथून रात्री सव्वा आठच्या सुमारास डान्स क्लासामधून घरी परतत असताना हा सगळा प्रकार तिच्याबाबतीत घडला. या तरूणाच्या अनपेक्षित कृतीमुळे तरूणी जीवाच्या आकांतानं ओरडत होती. हा सगळा प्रकार आजूबाजूच्या ठाणेकरांच्या लक्षात आल्यानंतर, ताबडतोब त्या तरूणीला उपचारांसाठी सिव्हिल रूग्णालयात हलवण्यातं आलं. 

याप्रकरणी, नौपाडा पोलीसांकडे तक्रारही नोंदविण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी कसून शोध घेतल्यानंतर, अखेर १३ मेला या अनोळखी इसमाचा शोध लागला. अब्दुल समद नूर महंमद शाखानी या २१ वर्षीय तरूणानं ही मिरचीची पूड काही कारण, नसताना या तरूणीच्या डोळ्यांत टाकली. मात्र, हा तरूण सीसीटीव्ही फुटेजमुळे पकडला गेला.

पाहा बातमीचा व्हिडिओ