मुख्यमंत्र्यांची ठाकरी तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार, या 16 अटींसह परवानगी

8 जूनला औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरु आहे.

Updated: Jun 4, 2022, 02:15 PM IST
मुख्यमंत्र्यांची ठाकरी तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार, या 16 अटींसह परवानगी title=

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांची आठ जून रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन झाली. या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली आहे. 16अटींसह ही परवानगी देण्यात आलेली आहे. 1 महिन्यापूर्वी शिवसेनेने परवानगीसाठी अर्ज केला होता. सभा आता पाच दिवसांवर आली आहे आणि तेव्हा पोलिसांनी अटी शर्ती सही परवानगी दिली आहे. 

पाहूयात काय आहे अटी
1. आयोजकांनी स्टेज स्टॅबिलिटी सर्टिफिकेट प्राप्त करावे आणि ते पोलिसांना द्यावे

2. ही सभा दुपारी चार ते रात्री साडेनऊ या वेळेतच घ्यावी सभेच्या वेळेत आणि जागेचा कोणताही बदल आता मान्य नाही करू नये

3. कार्यक्रम वेळी कोणताही रस्ता बंद करण्यात येऊ नये आणि वाहतुकीस अडथळा येणार नाही याची आयोजकांनी काळजी घ्यावी

4. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी शिस्त पाळावी, सभेत येताना किंवा परत जाताना कुठलीही हुल्लडबाजी वा घोषणाबाजी करू नये

5. सभेला येताना निर्धारित केलेल्या जागेवरच वाहनांचे पार्किंग करावे सभेच्या आधी व नंतर कुठलीही वाहन रॅली काढू नये मुख्यमंत्र्यांना सुरक्षा आहे त्या सुरक्षेत अडथळा येईल असं वागू नये

6. कार्यक्रमादरम्यान कुठलेही शास्त्र तलवारी चाकू बाळगू नये आणि शस्त्र नियमांचे उल्लंघन करू नये

7. सदर कार्यक्रमात आयोजकांकडे स्वयंसेवक नेमण्यात यावे आणि त्यांची माहिती पोलिस ठाण्याला द्यावी सोबतच किती लोकसभेला येण्याची अपेक्षा आहे याची माहिती एक दिवस आधी पोलिसांना द्यावी

8. सभा स्थानाची जेवढी क्षमता आहे तेवढ्याच लोकांना सभेला बोलावे जास्त लोक जमल्यास आणि त्यातून चेंगराचेंगरी झाल्यास संपूर्ण जबाबदारी आयोजकांची राहील त्यांच्यावर कारवाई होईल.

9. सभेच्या वेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या नागरिकांना तपासण्याचा अधिकार पोलिसांना राहील

10. ध्वनीपेक्षका बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल त्याचे उल्लंघन झाल्यास पाच वर्षाची शिक्षेची तरतूद आणि एक लाखाच्या दंडाची तरतूद आहे. (सभेसाठी 55 देसीबलची परवानगी आहे कारण सभा निवासी भागात आहे..)

11. या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक वाहन व्यवस्था बस सेवा ॲम्बुलन्स त्यांना अडथळा येणार नाही याची आयोजकांनी काळजी घ्यावी

12. सभेसाठी व्यवस्थित आणि सुरक्षित इलेक्ट्रिकल यंत्रणा राबवावी पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरचा ही वापर करावा त्याची सोय करावी

13. कायदा व सुव्यवस्थेचा अनुषंगाने आयोजकांकडून याबाबत कायद्याचे तंतोतंत पालन करण्यात येईल, कायदा सुव्यवस्थेला कुठलीही बाधा आल्यास त्यासाठी जबाबदार आयोजक असतील

14. कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी घालून दिलेल्या अटी शर्तींची पूर्णपणे अंमलबजावणी करणे आयोजकांना बंधनकारक आहे अथवा प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल याची आयोजकांनी नोंद घ्यावी