Tauktae चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किनारपट्टी भागात सतर्कतेचे आदेश

अरबी समुद्रातील तौत्के (Tauktae) चक्रीवादळाच्या अनुषंगाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी, असा आदेश दिला आहे.  

Updated: May 15, 2021, 10:25 AM IST
Tauktae चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किनारपट्टी भागात सतर्कतेचे आदेश  title=

 मुंबई : अरबी समुद्रातील तौत्के (Tauktae) चक्रीवादळाच्या अनुषंगाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी, असा आदेश दिला आहे. तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे अशा सूचना प्रशासनास दिल्या आहे. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी सज्ज राहावे आणि मनुष्यबळ तसेच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असेही मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत सांगितले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.

लक्षद्वीपच्या (Lakshadweep) समुद्रात तयार झालला कमी दाबाचे पट्टा अधिक सक्रीय होणार असून त्यामुळे चक्रीवादळामध्ये  (Cyclone) बदलले जाऊ शकते. चक्रीवादळाची स्थिती शनिवार  15 मे ते आगामी मंगळवार 18 तारखेदरम्यान राहणार आहे. गुजरातशिवाय रत्नागिरी, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच राजधानी मुंबईला (Mumbai)Tauktae या चक्रीवादळाचा तडाखा (Cyclone Tauktae) बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस कोरोना लसीकरण Corona Vaccination) थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. धोक्याच्या इशाऱ्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या (BMC)अधिकाऱ्यांनी कोरोना लसीकरण अभियान पुढील दोन दिवस तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे, तशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, कुलाबा वेधशाळा अधिकारी डॉ. जयंत सरकार यांनी चक्रीवादळ बनण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे सांगितले आहे. शनिवारी सकाळी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. सध्या हे वादळ  लक्षद्विप बेटांजवळ आहे. यावेळी मुसळधार पाऊस पडेल. 15 आणि 16 मे रोजी ते गोवा, दक्षिण कोकण किनारपट्टीवर ते येईल. 18 तारखेपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जावू नये, असा इशारा दिला आहे.. 

कोल्हापूर, सातारा,सांगलीच्या घाट क्षेत्रात तसेच काही भागातही पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच वाऱ्याचा वेग आज 50 ते 60 किमी आणि उद्या 60 ते 70 किमी किमी वेग प्रतितास असेल. अंतर्गत महाराष्ट्रात याचा जास्त फरक पडणार नाही, हे वादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. त्यामुळं निसर्ग वादळासारखे जास्त नुकसान  होण्याची शक्यता नाही, असे सांगण्यात आले आहे.