अंबामातेच्या भक्तांना राज्य सरकारचा दिलासा

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा आग्रह कोल्हापूरातील तमाम भक्तांचा आहे. आता पुजारी हटाव कायद्याबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय. 

Updated: Jan 15, 2018, 02:10 PM IST
अंबामातेच्या भक्तांना राज्य सरकारचा दिलासा title=

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा आग्रह कोल्हापूरातील तमाम भक्तांचा आहे. आता पुजारी हटाव कायद्याबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय. 

पेटला होता वाद

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यानी पगारी पुजारी नेमण्याच आश्वासन कोल्हापूरकरांना दिलं होतं. पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी दिलेल आश्वासन पाळल नाही म्हणून; पुजारी हटाव कृती समितीचे सदस्य आक्रमक झाले होते. आता पुढील दोन दिवसात यावर विधी विभागाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

काय मिळणार दिलासा?

यावर चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, ‘अंबाबाई मंदिर विकास आराखडा मंजूर करणार आहे. येत्या १७ तारखेच्या बैठकीत निर्णय होणार आहे. बैठकीत मंदिर विकास आराखडा निश्चित होणार. तसेच, तात्काळ दर्शन मंडप आणि पार्किंग बाबत काम सुरू होणार आहे. २६ जानेवारीला कोल्हापूर प्राधिकरणाची घोषणा होणार आहे’.