CCTV VIDEO : रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यांची तरुणाला मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

रस्त्यात धिंगाणा घालत टोळक्याने तरूणाला केली बेदम मारहाण

Updated: Oct 6, 2022, 07:02 PM IST
CCTV VIDEO : रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यांची तरुणाला मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद! title=

Gang Fight in Lingmala: महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर (Mahabaleshwar Pachgani Road) महादेव बाग हॉटेलसमोर जावळीतील काही युवकांनी महाबळेश्वरच्या एका युवकास मारहाण केल्याची धक्कदायक घटना घडली. या मारहाणीत महाबळेश्वरचा युवक जखमी झाला असून हा सर्व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (CCTV Video of youth was beaten up by a gang on mahabaleshwar pachgani road lingmala crime news)

दहा ते बारा युवकांचे टोळके लिंगमळा (Lingmala) येथे महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर महादेव बागसमोर असणाऱ्या रस्त्यावर नाचत होते. यादरम्यान महाबळेश्वरचा एक युवक पाचगणीवरून महाबळेश्वरला जात असताना रस्त्यावर धिंगाणा करणाऱ्या युवकांना बाजूला होण्याची विनंती केली (Youth was beaten up by a gang). याच गोष्टींचा तरुणांना राग आला. त्यामुळे रागातून जावळीचे युवक आणि महाबळेश्वर युवक यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि त्यानंतर बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.

तरुणांच्या तुंबळ हाणामारीत महाबळेश्वरचा युवक जखमी झाला आहे. जावळीतून आलेल्या युवकांच्या टोळक्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात (Mahabalehswar Police) गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, संपुर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला देखील काठीने तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी लगेचच प्रकरण समजून घेत गुन्हा दाखल (crime news) केला आहे.