खंडाळा स्टेशनजवळ मालगाडी रुळावरुन घसरली

लोणावळ्याजवळील खंडाळा रेल्वे स्टेशन जवळ एक मालगाडी रुळावरुन घसरल्याची घटना घडलीये. 

Updated: Sep 7, 2017, 05:05 PM IST
खंडाळा स्टेशनजवळ मालगाडी रुळावरुन घसरली title=

खंडाळा : लोणावळ्याजवळील खंडाळा रेल्वे स्टेशन जवळ एक मालगाडी रुळावरुन घसरल्याची घटना घडलीये. 

मालगाडीचे ७ डबे ट्रॅकवरुव घसरल्याने सुमारे १०० ते १५० मीटर लांबीच्या रेल्वे रुळाला याचा फटका बसला असून रूळ उखडले आहे, तर एक विजेचा खांब ही ट्रॅक वर पडला आहे. 

सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे मध्य रेल्वेची मुंबई कडून पुण्याकडे जाणारी मिडल आणि डाऊन लाईन वरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या लाईन केव्हा पूर्ववत होईल याचा अंदाज बांधणे सध्यातरी कठीण जात आहे