Global recession and business ideas : जगभरात मंदीचं सावट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने ( International Monetory Fund & World Bank ) याबाबत विविध माध्यमातून चुचनाही दिल्या आहेत. अमेरिका ब्रिटन सोबत जगभरातील विविध देशांना या जागतिक मंदीचा फटका ( Global Slowdown) बसताना पाहायला मिळेल असं IMF आणि World Bank म्हणते. भारतात थेट मंदी येणार नाही असं जाणकार सांगतायत, मात्र या मंदीची झळ मात्र भारताला बसू शकते. मात्र भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक तेजीने ( indian economy ) वाढणारी अर्थव्यवस्था असेल, असं देखील जाणकार सांगतात. अशा संवेदनशील परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशा काही व्यवसायाच्या संधी ( business ideas) सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही मंदीतही चांगलं उत्पन्न मिळू शकतं. कोणत्या आहेत या बिझनेस आयडिया?
जगात कितीही मोठी मंदी आली तरी नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची तजबीज करावीच लागते. यासाठी आपण सर्वच जण किराणामालाच्या ( Kirana Store Business) दुकानात जातोच. मंदी आल्यास पैसे वाचवण्यासाठी, सेव्हिंग करण्यासाठी मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंट्समध्ये जाणं नागरिक टाळतात. अशात गहू, तांदूळ, ज्वारी बाजरी दूध, ब्रेड यासारख्या गोष्टींसाठी आपण किराणा मालाचं दुकान गाठतो. साध्य ऑनलाईनचा जमाना आहे. अशात तुम्ही ऑनलाईन किराणा स्टोअर देखील सुरु करू शकतात.
जेंव्हा मोठी मंदी येते तेंव्हा खर्चात कपात करण्यासाठी नव्या गाड्या किंवा नवी उपकरणे घेणं कमी होतं. ज्यांच्याकडे बाईक किंवा कार्स आहेत ते उपलब्ध वाहनांची वेळच्या वेळी निगराणी राखून त्यांच वापरण्यावर भर देतात. म्हणजेच कार किंवा बाईक्स खराब झाल्यास त्यांना रिपेअर ( Car bike repair center) करण्यावर भर दिला जातो. अशात तुम्ही कार किंवा बाईक रिपेअरिंगचा व्यवसाय सुरु केल्यास तुमचा व्यवसाय तेजीत चालण्याची शक्यता आहे.
जगात कितीही मोठी मंदी येऊ द्या किंवा आणखी काही, आरोग्य सेवांसंबंधित व्यवसाय म्हणजेच मेडीकलची दुकानं, रुग्णालये, योगा क्लासेस, फिजियो थेरेपी, मानसोपचार समुपदेशन किंवा तशा प्रकारचे व्यवसाय कायम सुरु राहतात( healthcare releted business). मंदीमुळे लोकं स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची अधिक काळजी घेतात. इतर कोणत्याही गोष्टींमध्ये नागरिक पैसे वाचवत असले तरी आरोग्य सेवांसाठी पैसे खर्च करण्यास कुणीही कचरत नाही. त्यामुळे तुम्ही याप्रकारचा बिझनेस ( business ideas during recession ) सुरु करू शकता.