पंढरपूरमध्ये बस-कारचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

पंढरपूरच्या घाडगे वस्तीजवळील मोहोळ मार्गावर एसटी बस आणि कारची जोरदार धडक झाली आहे.

Updated: Feb 2, 2019, 07:50 PM IST
पंढरपूरमध्ये बस-कारचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू title=

पंढरपूर : पंढरपूरच्या घाडगे वस्तीजवळील मोहोळ मार्गावर एसटी बस आणि कारची जोरदार धडक झाली आहे. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. कारमधील दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारमधील सर्व प्रवासी हे मुंबईचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट असून पंढरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही कार पंढरपूरकडे येत होती, तर एसटी सोलापूरच्या दिशेनं चालली होती. कारचा वेग जास्त असल्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता एवढी होती की कार बसच्या आतमध्ये जवळपास तीन फूट गेली. यामुळे कारमधल्या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर लहान मुलं गंभीर जखमी झाली. या जखमींना सोलापूरमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे.