सांगली : सोनहिरा आणि विराज कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ३५ बैलगाडी मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांजवळ ही कारवाई करण्यात आलीय. बैलांचा छळ करणे, मर्यादेपेक्षा जास्त ऊस बैलगाडीतून वाहतूक करणे, बैलाच्या कानाजवळ खिळे मारणे, बैलांना विश्रांती न देणे, आजारी बैलांचा वाहतुकीसाठी वापर करणे या कारणामुळे ही कारवाई करण्यात आलीय.
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली. ऊस वाहतूक प्रकरणी प्राण्यांच्या छळाबाबत ही कारवाई आत्तापर्यंतची महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई ठरलीय.