लग्नमंडपात बैल घुसल्याने १२ जण जखमी

धक्कादायक बातमी मनमाडमधून. लग्नमंडपात लग्नाची लगबग सुरू असताना अचानक एक बैल घुसला. बैलानं धुमाकूळ घालत १० ते १२ वऱ्हाडींना जखमी केलंय.

Updated: Feb 20, 2018, 03:57 PM IST
 लग्नमंडपात बैल घुसल्याने १२ जण जखमी title=

नाशिक : धक्कादायक बातमी मनमाडमधून. लग्नमंडपात लग्नाची लगबग सुरू असताना अचानक एक बैल घुसला. बैलानं धुमाकूळ घालत १० ते १२ वऱ्हाडींना जखमी केलंय.

लग्न सुरू असताना अचानक बैल मंडपात घुसला आणि वऱ्हाडींच्या अंगावर धावून गेला.  देवळा तालुक्यातल्या कुंभारडे गावात ही घटना घडलीय. जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.