मुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातोय.
१९८२ पासून दरवर्षी १२ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा केला जातो.जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राज्यभरातून शिवप्रेमी सिंदखेडराजा येथे येऊन जिजाऊंना अभिवादन करतात.जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी सिंदखेदराजात विविध कार्यक्रमाचं आयोजन केल जातं. यावर्षी देखील विविध सामाजिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
आज सकाळी ७ वाजता राजवाड्यात जिजाऊंची पूजा पार पडली.जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे,राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या देखील सिंदखेडराजा येथे येउन जिजाऊंना अभिवादन करणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज सिंदखेडराजा दौऱ्यावर आहेत.दरम्यान केजरीवाल हे सिंदखेडराजात दाखल झाले आहे.येथे दाखल झाल्यानंतर केजरीवाल यांनी सर्वप्रथम जिजाऊंच्या जन्मस्थळी भेट दिली.यावेळी केजरीवाल यांनी जिजाऊंना अभिवादन केलं.राज्यातील आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन या देखील यावेळी उपस्थित होत्या.केजरीवाल हे सिंदखेडराजा येथे महाराष्ट्र संकल्प सभा घेणार असून ते काय भाष्य करतात याकडे अवघ्या महाराष्ट्रच लक्ष लागलंय