Nashik ATS : नाशिक शहरात दहशतवाद विरोधी पथकानं मोठी कारवाई केलीय. इसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडींग केल्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आलीय. हुजेफ अब्दुल अजीज शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या घरातून 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि तीन जुने सिमकार्ड हस्तगत करण्यात आले आहेत. राबिया उर्फ उम ओसामा या पाकिस्तानी महिलेच्या सांगण्यावरून आरोपीने पाठवले पैसे पाठवल्याचा आरोप आहे.