खासगी शाळेत बाऊन्सर : पुण्यातील 'त्या' शाळा संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

Pune School Bouncers : पुण्यातील क्लाईन मेमोरियल स्कूलच्या (Kline Memorial School) संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.  

Updated: Mar 15, 2022, 04:54 PM IST
खासगी शाळेत बाऊन्सर : पुण्यातील 'त्या' शाळा संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश title=

मुंबई / पुणे : Pune School Bouncers : पुण्यातील क्लाईन मेमोरियल स्कूलच्या (Kline Memorial School) संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत विधानभवनात विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या उपस्थित त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत पोलिसांना हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडही बैठकीला उपस्थित होत्या.

पुण्यातील 33 अनधिकृत शाळांची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. तसेच खासगी शाळेत बाऊन्सर नेमू नयेत. सुरक्षारक्षक नेमायचे झाल्यास ते नोंदणीकृत आणि अधिकृत संस्थेकडून घ्यावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहेत. खासगी शाळांनी पालकांसोबत कसे वागावे याची कार्यपद्धती ठरवली जाणार आहे. 

प्रत्येक खासगी शाळांमध्ये फलक लावावेत आणि त्या फलकावर शाळेशी संबंधित शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची नावे संपर्क क्रमांकासह लिहावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.तक्रार आल्यास शिक्षण विभागाने तीन महिन्यांच्या आत चौकशी करून अहवाल पाठवावा.

Pune School Lets Loose Bouncers on Students' Parents Over Fees Dispute

 क्लाईन मेमोरियल शाळेत बाऊन्सरकडून पालकांना झालेल्या मारहाणीबाबत विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पुण्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील ज्या शाळेत खासगी बाऊन्सरकडून पालकांना जी मारहाण झाली होती. याप्रकरणी शिक्षण विभाग आणि पोलिसांच्या चौकशीत विसंगती दिसून येत आहे. बाऊन्सरकडून मारहाण झाल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीत समोर आलेले आहे. तर दुसरीकडं पोलिसांच्या चौकशीत मात्र मारहाण झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी शिक्षण विभागाचा अहवाल घेवून कारवाई करावी, असं या समितीत ठरले आहे.