गोदावरी नदीत उलटली भाविकांची बोट, गावकऱ्यांनी 35 जणांना वाचवलं

Updated: Jun 11, 2018, 03:18 PM IST

जालना : गोदावरी नदीत भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटल्यानंतर मोठी दुर्घटना होता होता टळली. या बोटीतून प्रवास करणारे ३५ भाविक जवळजवळ बुडणारच होते. मात्र गावकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य केल्यानं सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. धोंड्याचा महिना संपण्यास अवघा एक दिवस शिल्लक असल्यानं मंगळवारी भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. त्याच दरम्यान जालना जिल्ह्यातील गोळेगाव येथून दर्शनासाठी येणारी एक बोट गोदावरीत उलटली.

३५ भाविक या बोटीमध्ये होते. बुडता बुडता वाचलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील २२ सदस्यांचा समावेश आहे. यामधील काही जण बेशुद्ध असल्यानं त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.