Udayanraje Bhosale : उदयनराजे यांचा थेट सवाल, 'युगपुरुष महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का ?'

 Udayanraje Bhosale Protest : शिवरायांचा सतत अपमान केला जातोय. तरी सर्वजण ऐकून घेत आहेत.  महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का, असा थेट सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे.

Updated: Dec 3, 2022, 12:52 PM IST
Udayanraje Bhosale : उदयनराजे यांचा थेट सवाल, 'युगपुरुष महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का ?' title=

Udayanraje Bhosale Protest at Raigad: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी लोकशाहीचा ढाचा निर्माण केला आहे. (Maharashtra Political News ) महाराजांनी सर्वधर्म समभाव विचार दिला. जुलमी राजवटीतून मोकळा श्वास महाराजांनी दिला. शिवरायांचा सतत अपमान केला जातोय. राज्याला विचार देणाऱ्या महाराजांचीच विटंबना. महाराजांचा अपमान. तरी सर्वजण ऐकून घेत आहेत. काहीजण समर्थनाच धाडसंही दाखवता. 'महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का, असा थेट सवाल भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी विचारला आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरुन उदयनराजे आक्रमक झाले आहेत. 

आता आझाद मैदानात एल्गार

दरम्यान, युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात लवकरच आझाद मैदानात एल्गार करणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन राज्यात दौरा करणार असल्याचंही ते आपल्या भाषणात म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीवर प्रतिसाद न मिळाल्याने उदयनराजेंनी रायगडावर निर्धार शिवसन्मानाचा हे आंदोलन केले. शेकडोंच्या संख्येने उदयनराजे भोसले रायगडावर दाखल झाले. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करून राजसदरेवर काही काळ ते आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाला बसले होते. त्यानंतर त्यांनी राजसदरेवरून आपली भूमिका मांडली. त्यात त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली. 

'महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यास देश फुटला'

युगपुरुषाच्या प्रतिमेचा अवमान देशात होत आहे. महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही,  महाराजांच्या अपमान सहन करणंही चूक आहे. सर्वधर्मसहभागाच्या विसर पडल्यास देशाची फाळणी उघड आहे. महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यास देश फुटला म्हणून समजा, अशी भीती उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झालाय. महाराजांचं नाव घेता पण विचार विसरता. सध्या मात्र स्वत:च्या फायद्याचा विचार होत आहे. 'देशाचे 30 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही' 'स्वार्थी, व्यक्तिकेंद्री राजकारण झाले आहे, असे सांगत शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावरुन उदयनराजे यांनी सर्व राजकीय नेत्यांना टोला लगावला.

तुम्हाला लाज वाटली पाहिजे - उदयनराजे

महाराजांच्या अपमानावरुन पांघरुण घालताना लाज वाटली पाहिजे. राज्यापाल पदावरुन महापुरुषांचा अपमान होतो आहे. खिल्ली उडवत असताना आपण पाहात बसलो आहोत? महाराजांचा अपमान आपला सर्वांचा अपमान आहे. विकृत लोकांच्या तावडीत देश गेलाय. पदावर बसलेले लोक रयतेमुळे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अपमान झाल्यावर गप्प बसले, नीतीमत्ता गेली कुठे?, 'चूक ती चूक पांघरुण घालणाऱ्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे, असा इशारा उदयनराजे यांनी यावेळी दिला.

दरम्यान, राज्यपाल पदावरून भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी आज खासदार उदयनराजे भोसले यांचं रायगडावर आक्रोश आंदोलन आहे. उदयनराजे रायगडावर शेकडो समर्थकांसह दाखल झाले आहेत. पाचाडमध्ये राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन उदयनराजे रोप वेने रायगडावर दाखल झाले. निर्धार शिवसन्मानाचा असं या आंदोलनाला नाव देण्यात आलंय. राज्यपालपदावरून कोश्यारींना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतरही कारवाई न झाल्याने उदयनराजे संतापले आहेत.  

छत्रपती उदयनराजे रोपवेने रायगडावर पोहोचले. त्यांनी पहिल्यादा शिरकाई देवीचे दर्शन घेतले. होळीचा माळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला अभिवादन केले. त्याआधी उदयनराजेंनी राजमाता जिजाईंच्या समाधीचं पाचाडमध्ये दर्शन घेतले.