चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील भाजपच्या नेत्या आणि पंचायत समिती सदस्या शालू शिंदे यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वीच पंचायत समितीची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत शालू विवेक शिंदे घुग्घुस मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यांचे वॉर्ड क्रमांक ६ येथे घर आहे. शालू शिंदे यांचा ब्युटीपॉर्लरचाही व्यवसाय होता.
त्यांनी घरातच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. भाजपच्या अनेक पदाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. शालू यांचे पती चंद्रपुरातील एका महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत. आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.