जालन्याच्या पाणीप्रश्नासाठी भाजपचा जलआक्रोश मोर्चा, देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारने जाणीवपूर्वक कोट्यवधींच्या योजना रखडवल्याचा आरोप 

Updated: Jun 15, 2022, 01:42 PM IST
जालन्याच्या पाणीप्रश्नासाठी भाजपचा जलआक्रोश मोर्चा, देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल title=

जालना : जालन्यातल्या पाणीप्रश्नावर आज भाजपने (BJP) जनआक्रोश मोर्चा काढलाय. या जनआक्रोश मोर्चाला प्रचंड गर्दी झालीय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय. 

सरकारने जाणीवपूर्वक कोट्यवधींच्या योजना रखडवल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. जालना शहरात 15 दिवसांनी पाणी येतं. त्यामुळे नागरिक प्रचंड आक्रमक झालेत. भाजपकडून मामा चौक ते गांधी चमन चौक असा हा जलआक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. मोर्चा संपल्यानंतर गांधी चमन चौकात फडणवीसांची सभा होणार आहे.

जालनामध्ये 15 दिवसांनी पाणी येत आहे, आज धरणामध्ये भरपूर पाणी आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेली दोन वर्ष धरण भरलेलं असतानाही पाणी मिळत नाहीए. याविरोधात महिला ज्या रस्त्यावर उतरल्या आहेत तो आक्रोश आहे. 

आमच्या सरकारच्या काळात 129 कोटी रुपये आम्ही जालनाल्या पाणी पुरवठ्याला दिले. गेल्या दोन अडीच वर्षात सरकार हे कामही करुन शकलेलं नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. आहा आक्रोश संघटीत झाला आहे, सरकारला जागं करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, भाजपच्या जलआक्रोश मोर्चावर शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी टीका केलीय. नगरपरिषदेत 5 वर्षे काँग्रेसशी गळाभेट घेतली आणि आता मोर्चा काढण्यात येतोय अशा शब्दांत त्यांनी टीका केली.