आळंदीमध्ये भाजप नगरसेवकाची भरदिवसा हत्या

आळंदी नगरपालिकेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या करण्यात आली आहे.

Updated: Jun 26, 2018, 06:28 PM IST

पिंपरी-चिंचवड : आळंदी नगरपालिकेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या करण्यात आली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्यानं कांबळे यांच्यावर कोयत्यानं वार केले. आळंदीमध्ये अंबर बस स्टॉपजवळ बालाजी कांबळे यांची हत्या करण्यात आली. कांबळे यांचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. बालाजी कांबळे यांच्या हत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. बालाजी कांबळे हे व्यवसायानं बिल्डर आहेत. पाच वाजताच्या सुमारास बालाजी कांबळे भोसरीवरून ते आळंदीला दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बालाजी कांबळे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढली होती.