भाजप नगरसेविकेचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संख्या समान झाल्याने नगराध्यक्ष निवडणुकीत पेच

भाजप नगरसेविकेच्या निधनामुळे आता कोणाचा नगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Updated: Feb 13, 2022, 04:22 PM IST
भाजप नगरसेविकेचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संख्या समान झाल्याने नगराध्यक्ष निवडणुकीत पेच title=

नाशिक : सुरगाण्याच्या नवनिर्वाचित भाजप नगरसेविकेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कासुबाऊ नागु पवार असं या नगरसेविकेचे नाव आहे. वापी येथे सहलीसाठी गेल्या असताना त्यांचं निधन झालं आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत पेच तयार झाला आहे.

दोन्ही बाजूला नगरसेवक संख्या समान झाल्याने नगराध्यक्ष कोणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजप - राष्ट्रवादी व शिवसेना यांची सदस्य संख्या समान झाली आहे.

सुरगाणा नगरपंचायतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. सुरगाणा नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 8 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. दुसरीकडे शिवसेनेने 6 तर राष्ट्रवादीने 1 आणि माकपाला 2 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता माकप किंगमेकर ठरणार आहे.