Sachin Waze Anil Deshmukh News : आजी आणि माजी गृहमंत्र्यांच्या आरोप प्रत्यारोपात आता जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंची एन्ट्री झालीय. वाझेंच्या एन्ट्रीमुळे देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या वादात मोठा ट्विस्ट आला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
जेलमध्ये असलेल्या सचिन वाझेंनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे...याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य वाझेंनी केले. या पत्रात जयंत पाटलांसह इतरांचंही नाव वाझेंनी लिहिल्याने खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीसांवर अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी अतिशय गंभीर केले होते. आता वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
सचिन वाझेंचे आरोप अनिल देशमुखांनी फेटाळून लावले
दरम्यान सचिन वाझेनं केलेले आरोप अनिल देशमुखांनी फेटाळून लावलेत. ही देवेंद्र फडणवीसांची नवी चाल असल्याचा आरोप देशमुखांनी केलाय. सचिव वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं हायकोर्टानं म्हटल्याचाही आरोप अनिल देशमुखांनी केलाय.
वाझेंच्या आरोपानंतर रावसाहेब दानवेंनी इशारा दिलाय. अजून अनेक लेटरबॉम्ब आमच्याकडे आहेत ते लवकरच बाहेर येतील असा दावा दानवेंनी केलाय. देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई होऊन पैसे सापडले नाहीत. तर ते पैसे पुढे कुठे गेले याचा शोध घेतला पाहिजे. या पैशांचा कर्ता धर्ता कोण यांचा शोध घ्या...सगळ्या महाराष्ट्राला कोण कर्ता धर्ता आहे हे माहीत आहे असं म्हणत नाव न घेता पवारांना टोला लगावलाय.
खून, दहशतवादातील आरोपी असलेला वाजे हा भाजपचा प्रवक्ता
वाझेंनी केलेल्या आरोपानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय. भाजप सचिन वाझेचा वापर करतंय...खून, दहशतवादातील आरोपी असलेला वाजे हा भाजपचा प्रवक्ता आहे...देशमुखांना तुरुंगातला प्रवक्ता उत्तर देतो...असा घणाघात राऊतांनी केलाय...
वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झालेयत..सचिन वाझे मविआच्या जावई आहे, त्याची चौकशी करा अशी मागणी नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी केलीय...तर सचिन वाझेंची नार्कोटेस्ट झाल्यानंतर देशमुखांचं पितळ उघडं होईल असं परिणय फुकेंनी म्हटलंय...