जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी मोठी बातमी; मोबाईल वापरासंदर्भात घेतला निर्णय...

  शिक्षकांसाठी जिल्हा परिषदेनं मोठा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये शिक्षकांना आता मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मोबाईल वापरल्यास शाळा व्यवस्थापन समिती मोबाईल जप्त करणार आहे. 

Updated: Apr 6, 2022, 01:46 PM IST
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी मोठी बातमी; मोबाईल वापरासंदर्भात घेतला निर्णय... title=

सोलापूर :  शिक्षकांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेनं मोठा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये शिक्षकांना आता मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मोबाईल वापरल्यास शाळा व्यवस्थापन समिती मोबाईल जप्त करणार आहे. विद्यार्थ्यांना शिकविताना आता शिक्षकांनी मोबाईल वापरू नये, असा नियम जिल्हा परिषदेने केला आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेनं शिक्षकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये शिक्षकांना आता मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्टाफरूम वगळता अन्य ठिकाणी शाळेच्या वेळेत मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर आता दंडात्मक कारवाई होणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून दंडाची रक्कम निश्चित केली जाणार आहे. जून 2022 पासून या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

शिक्षकांना यासाठी केला नियम

- विद्यार्थ्यांना शिकविताना फोन आल्यास अध्यापनात येऊ शकतो व्यत्यय
- वर्गात मुले असताना मोबाईलवर बोलणाऱ्या शिक्षकांमुळे मुलांच्या मनावर होऊ शकतो विपरीत परिणाम
- शिक्षक मोबाईल वापरतात म्हणून मुलेही आणू शकतात वर्गात मोबाईल
- गुणवत्तावाढीचा प्रयत्न करताना व्यत्यय नकोच; शिक्षकांनी पर्समध्ये तथा स्टाफरूममध्ये ठेवावा मोबाईल

शालेय विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांचा मोबाईलमध्ये वेळ जाऊ नये. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून शिक्षकांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.