मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये झालेल्या आरोग्य विभागातील भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. राज्यातील असंख्य उमेदवारांकडून भरती रद्द करण्याची मागणी होत होती. आरोग्य विभागातील गट क आणि गट ड मधली भरती पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
राज्यात काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू होता. शिवसेनेतील बंडाळीमुळे महाविकास आघाडीला सत्ता गमवावी लागली आहे. परंतू याआधी दोन दिवसात महाविकास आघाडीने मोठे निर्णयांचा सपाटा लावला. त्यामध्ये औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर तसेच पोलीस भरतीबाबत निर्णय जाहीर केले आहेत.
त्याचवेळी राज्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडलेल्या आरोग्य भरतीबाबतही गत सरकारने निर्णय घेतला आहे. आरोग्य सेवा भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा विषय 'झी 24 तास'ने लावून धरला होता.
त्याची दखल घेत अखेर सरकारने ही भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भ्रष्टाचारला आळा बसणार आहे. जे उमेदवार गैरप्रकार करून भरती होण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना यामुळे लगाम बसणार आहे.