Mumbai Crime News : मुंबई एटीएसची मोठी कारवाई केली आहे. मुंबई एटीएसने बोरिवली पूर्व एलोरा गेस्ट हाऊसमधून 6 जणांना अटक केली आहे. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र देखील हस्तगत करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. मोठ्या प्रमाणाच शस्त्र कशासाठी आणली होती? कोणता घातपाताचा कट तर नव्हता ना? याचा पोलिस तपास करत आहेत.
मुंबई एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने ताब्यात घेतलेले 6 आरोपी दिल्लीहून मुंबईत आले होते. हे आरोपी मुंबईत काही मोठा गुन्हा करण्यासाठी आले होते की कुणाला शस्त्र पुरवण्यासाठी आले होते, याचा तपास मुंबई एटीएस आणि कस्तुरबा पोलीस करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 जणांना उत्तर प्रदेश एटीएसकडून नोटीस बजावण्यात आलीय. उत्तर प्रदेशातील एका धार्मिक स्थळाबाबत विखारी वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस दिलीय. 17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये या संशयितांनी एक गुप्त बैठक घेतली होती. या बैठकीचा व्हिडिओ तेलंगणा पोलिसांच्या हाती लागला होता.
भंडारा जिल्ह्यात आंधळगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी वृद्धाला धकाबुक्की केली असल्याने नाकातून रक्त निघाले. हा व्हिडिओ समाज मद्यामांवर चांगलाच वायरल झाल्यानें बातम्या सुध्दा प्रकाशित झाल्या. त्यामुळे ठाणेदार यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल झालं आहे.
मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उसर्रा येथिल सुधाकर बोपचे यांची गावात जागा आहे. पण या जागेवर तुमसर येथिल अग्रवाल यांनी दावा केला आहे. हा प्रकरण न्याय प्रविष्ट असून आपल्या जागेवर बांधकाम करत असल्याची माहिती अग्रवाल यांनी आंधळगाव पोलीसांना दिली म्हणुन पोलिस घटनास्थळी पोहचत सुधाकर बोपचे यांना विचारपूस करत होते. तेवढ्यात पोलिस व बोपचे यांच्यात चांगलाच साबधिक वाद झाला. आंधळगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजकुमार यांनी बोपचे यांना जोरदार धक्का दिला. त्यात बोपचे हा खाली पडला त्यामुळे त्याच्या नाकातून रक्त निघाल्याने पोलिसांनी आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप करत बोपचे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती . आता पोलिस विभाग खळबळून जागा झाला. व ठाणेदार राजकुमार यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाही करणार असल्याची ग्वाही खुद्द पोलिस अधिक्षक यांनी दिली आहे. त्यामुळे आता ठाणेदार यांच्यावर काय कारवाई होतें ते पाहण्यासारख असेल.