भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरण : एकनाथ खडसेंना एसीबीची क्निलचीट

भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना एसीबीने क्लिनचीट दिली आहे

Updated: May 1, 2018, 12:47 PM IST
भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरण : एकनाथ खडसेंना एसीबीची क्निलचीट  title=

पुणे : भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना एसीबीने क्लिनचीट दिली आहे. एसीबीच्या रिपोर्टमध्ये खडसेंना दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसेंवर MIDC जमीन खरेदीत पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप होता. या वादामुळे त्यांना आपल्या पदावरूनही पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे गेले काही दिवस खडसे बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळाले. पण खडसेंकडुन पदाचा दुरूपयोग न झाल्याचे एसीबीकडून स्पष्ट झाले आहे.