धक्कादायक! गुदद्वारातून भरली हवा आणि पुढे काय झालं पाहा...

दोस्तीत मस्ती आणि मस्तीतून गेम,  मस्ती अंगाशी आणि खेळ खल्लास 

Updated: Dec 3, 2021, 07:13 PM IST
धक्कादायक! गुदद्वारातून भरली हवा आणि पुढे काय झालं पाहा... title=

कपिल राऊत, झी 24 तास, भिवंडी: कधीकधी मस्करीची कुस्करी होते. ती मस्करी जीवघेणी ठरते. अशा प्रकरची मस्करी महागात पडू शकते याचा प्रत्यय एका घेटनेतून आला आहे. बर्थडे सेलिब्रेशन आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मस्करी करावी पण ती कुणाच्या जिवावर बेतणारी असू नये.

एखाद्याची मस्करी किती महागात पडू शकते याचा प्रत्यय भिवंडीकरांना आला आहे. दोघांनी गंमत म्हणून एका तरूणाच्या पोटात हवा भरली. मात्र त्यात या तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

दोन आरोपींनी मस्करीच्या नादात एका तरुणाचा जीवच घेतला. मुन्ना आणि बिट्टूकुमार अशी या दोघा आरोपींची नावं आहेत. मुन्ना, बिट्टूकुमार आणि त्यांचा सहकारी अब्दुल रफिक मन्सुरी भिवंडीतल्या सिल्स मिल्स लूम कारखान्यात कामाला होते. 

काम आटोपल्यानंतर नेहमीसारखी तिघांमध्ये थट्टा-मस्करी सुरू होती. त्यातूनच दोघा आरोपींनी टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनचा पाईप अब्दुलच्या गुदव्दारात घुसवून मशीन सुरु केली. हवेचा प्रेशर प्रचंड असल्यानं ही हवा थेट पोटात गेली. 

पोटात हवा भरल्याचा परिणाम अब्दुलच्या आतड्यांवर झाला. त्याला तातडीनं रूग्णालयात दखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुन्ना आणि बिट्टूकुमार या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

या जीवघेण्या मस्करीनं एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे कुणाचीही मस्करी करताना भान ठेवा. तुमची मस्करी कुणाच्य़ा जीवावकर बेतणार नाही याची खबरदारी घ्या.