आमदारांचा नादखुळा... ढोलाचा ठोका पडताच संदीप क्षीरसागर थिरकले आणि...

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांची. या ना त्या कारणाने ते कायम चर्चेत असतात. 

Updated: Feb 20, 2022, 11:19 AM IST
आमदारांचा नादखुळा... ढोलाचा ठोका पडताच संदीप क्षीरसागर थिरकले आणि...
छाया सौजन्य- सोशल मीडिया

विष्णू बुरगे, बीड : राजकीय नेते कायमच या न त्या कारणाने चर्चेत असतात. त्यातही आपली सामाजिक प्रतिमा पाहता त्याला शह देत ही मंडळी चौकटीबाहेरचं वागताना दिसले तर या चर्चांना आणखी वाव दिला जातो. 

अशीच चर्चा सुरु आहे, बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांची. या ना त्या कारणाने ते कायम चर्चेत असतात. 

मागील काही दिवसांपासून त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग,  'झुकेगा नाही....' आपल्या भाषेत म्हटला आणि एकच कल्ला झाला. 

आता म्हणे त्यांनीच बीड जिल्ह्यामध्ये शिवजयंती उत्सव साजरा होत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांत आपलं आणखी एक नवं रुप सर्वांसमोर आणलं. 

क्षीरसागर यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये मुंबई- पुण्याचे ढोल पथक हे मुख्य आकर्षण ठरले.

ढोलावर ठोका पडला, ताशाची काठी फिरली आणि यावेळी कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी क्षीरसागर यांनी ढोल ताशावर ठेका धरला. यावेळी उपस्थित नागरिकांनी मोठा जल्लोष केला. 

कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वच नागरिकांचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आभार देखील मानले.  सध्या बीड शहरासह जिल्ह्यामध्ये क्षीरसागर यांनी ढोल ताशा वर धरलेला ठेका चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x