संतापजनक, बलात्कार पीडितेला गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत चक्क ठराव

एक संतापजनक बातमी बीडमधून. बीड (Beed) जिल्ह्यातल्या गेवराईमधल्या (Georai Gram Panchayat) पाचेगावमध्ये अजब प्रकार घडला आहे. 

Updated: Dec 29, 2020, 01:01 PM IST
संतापजनक, बलात्कार पीडितेला गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत चक्क ठराव  title=

बीड : एक संतापजनक बातमी बीडमधून. बीड (Beed) जिल्ह्यातल्या गेवराईमधल्या (Georai Gram Panchayat) पाचेगावमध्ये अजब प्रकार घडला आहे. बलात्कार पीडितेला (Rape Victim)  गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत (Georai Gram Panchayat)चक्क ठराव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठरावावर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तबही केले आहे.

दरम्यान, गावकऱ्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडेही या महिलेला गावबंदी करावी यासाठी निवेदन दिले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या संतापजनक प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात काय चालले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पाच वर्षांपूर्वी या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा देण्यात आली. मात्र त्यानंतर या पीडित महिलेच्या मुलीवरही अत्याचार करण्यात आला. आणि हे प्रकरण दाबण्यासाठीच आपल्यावर गाव सोडण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.