Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात, बाप-लेकासह पाच जणांचा जागीच मृत्यू

Beed Accident News : बीड जिल्ह्यात ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.  या अपघात बाप-लेकासह पाच जणांचा जागीत मृत्यू झाला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Jan 13, 2024, 10:26 AM IST
Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात, बाप-लेकासह पाच जणांचा जागीच मृत्यू title=

Beed Accident News In Marathi : बीड जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बीडमधील मांजरसुंबा-पाटोदा या महामार्गावर कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. पिकअपमधील नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप यांचा समावेश असून कंटेनरमधील चालकासह अन्य 1 जण ठार झाले आहेत. या भीषण अपघातात बाप-लेकाचाही समावेश होता. 

ही घटना 12 जानेवारी 2024 म्हणेज शुक्रवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास बीड-नगर रस्त्यावरील लिंबागणेश गावापासून काही अंतरावर असलेल्या ससेवाडी शिवारात घडली. तसेच या अपघातत प्रल्हाद सीताराम घरत (वय 63), नितीन प्रल्हाद घरत (वय 41, दोघेही रा. महाजनवाडी जि. बीड) या बाप लेकासह विनोद लक्ष्मण सानप (वय 40 रा. वाघिरा जि. पाटोदा) यांचा मृत्यू झाला. अन्य दोन मृतांची रात्री 11 वाजेपर्यंत ओळख पटलेली नव्हती. तसेच या अपघातात ओळख न पटलेले ट्रकमधील असल्याचे समजत आहे. 

अपघात एवढा भीषण होता की सर्व मृतांना बाहेर काढण्यासाठी एकत्र अडकलेल्या वाहनांचे पत्रे काढण्यासाठी यंत्र मागवावे लागले होते. रात्री 10 वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी एक क्रेन ही आणण्यात आला होता. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

या अपघातानंतर कंटेनरमधील लोखंडी पाईप रस्त्यावर पडल्याने वाहतूक खोळंबली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढला आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महाजनवाडी व वाघेरा गावावर शोककळा पसरली आहे.