रायगड : एकीकडे कोकणवासियांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असताना, दुसरीकडे वरुणराजानही रायगड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पहाटेपासून रायगड जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, खालापूर, पेण, पाली, अलिबाग, महा, पनवेल अशा सर्वच ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वच नदया दुथडी भरून वाहत असून नद्यांनी धोक्याची पातळीदेखील ओलांडली आहे. दरम्यान नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणा-या चौक इथलं मोरबे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. रात्री किंवा शनिवारी सकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने चौक गावा जवळील इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.