बंडातात्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या 'रुपाली' आक्रमक...पाहा काय म्हणाल्या

बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. बंडातात्या कराडकर यांनी महिला

Updated: Feb 4, 2022, 04:15 PM IST
बंडातात्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या 'रुपाली' आक्रमक...पाहा काय म्हणाल्या title=

पुणे : बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांविषयी केलेल्या बेछूट वक्तव्याविषयी कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या रुपाली चाकणकर यांनी बंडातात्या यांच्याकडून ४८ तासांच्या आत लेखी उत्तर मागितलं आहे. 

तर राष्ट्रवादीमधील पुण्याच्या रुपाली पाटील, ज्या नुकत्याच मनसेतून राष्ट्रवादीत आल्या आहेत, त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. 

सुप्रिया सुळे असू देत नाहीतर पंकजा मुंडे असू देत महिलांविरोधात असं बेछूट, बेजबाबदारपणे बोलणे आणि त्यानंतर माफी मागणे योग्य नाही. रुपाली पाटील यांनी पुण्यातील ज्ञानेश्वर पादुका चौकात आक्रमक आंदोलन सुरु केलं आहे.

महिलांच्या आत्मसन्मानाला हा धक्का आहे, यापुढे महिलांविरोधात असं कुणीही वक्तव्य केलं तर कारवाई केली जाईल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.