अहमदनगरमधील आरतीने बॉक्सिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडलं

जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही परिस्थीती असो त्या परिस्थीतीवर मात करता येते हे दाखून दिलंय अहमदनगरमधल्या आरती भोसलेनं.

Updated: Dec 23, 2017, 08:22 PM IST
अहमदनगरमधील आरतीने बॉक्सिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडलं title=

निखील चौकर, झी मीडिया अहमदनगर : जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही परिस्थीती असो त्या परिस्थीतीवर मात करता येते हे दाखून दिलंय अहमदनगरमधल्या आरती भोसलेनं.  घरची परिस्थीती अत्यंत हालाखिची असतानाही जिद्दीने बॉक्सिंग या खेळात नॅशनल लेव्हलवर गोल्ड मेडल मिळवलं आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

अहमदनगर जिल्ह्यातल्या बुर्हाणनगर गावात राहणारी आरती भोसलेच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब, घर अगदी पत्र्याचं, शाळेत शिकत असताना तिनं बॉक्सिंगविषयी वाचलं आणि बॉक्सिंगमध्येच करिअर करायचं ठरवलं. 

सहावीत असताना आरतीनं शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. सुरुवातीलाच राष्ट्रीय पातळीवरच्या बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्याच स्पर्धेत आरतीनं सुवर्णपदक मिळवलं. 

आरतीनं आत्तापर्यंत राष्ट्रीय पातळीवर ३ सुवर्णपदक, सिनियर नॅशनलसाठी कांस्यपदक, जुनिअर नॅशनल साठी २ कांस्यपदकं एवढी पदकं मिळवली आहेत. 

आरतीची परिस्थीती अत्यंत गरीब आहे. तरी या सगळ्यांशी दोन हात करत आरतीनं बॉक्सिंगचा सराव सुरू ठेवलाय. तिच्या या यशाचं आईला कौतुक आहे. 

महिलांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी महिलांनी स्वयंसिद्ध होण्याची गरज आहे, असं आरती म्हणते. त्यासाठी मुलींनी बॉक्सिंग, कुस्ती असे खेळ आवर्जून शिकायला हवे, असं आरती सांगते.

आरती ज्या गावात राहते, तिथे मुलींच्या शिक्षणासाठीही फारसा पुढाकार घेतला जात नाही, मुलगी वयात आली की तिचं लग्न करुन दिलं जातं. शिक्षणासाठीच उत्साह नाही, तिथे खेळांत करिअरबद्दलचा उत्साह काय असणार.... अशा परिस्थितीतवर आरतीनं मात केली आणि ग्रामीण भागातल्या मुलीही मनात आणलं तर बॉक्सिंगसारख्या खेळांत करिअर करु शकतात, हे दाखवून दिलंय.

अहमदनगरमधील आरतीने बॉक्सिंगमध्ये मिळवलं गोल्ड मेडलं