धक्कादायक! अंबाबाई मंदिरात घातपाताच्या फोनमागे 'सासरा -जावयाची' करामत

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने सुरक्षायंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली होती

Updated: Oct 8, 2021, 04:04 PM IST
धक्कादायक! अंबाबाई मंदिरात घातपाताच्या फोनमागे 'सासरा -जावयाची' करामत title=

कोल्हापूर : नवरात्र उत्सवाला कालपासून सुरुवात झाली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने सुरक्षायंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली. 

पोलिसांना तात्काळ मंदिर आवारात धाव घेत कर्मचारी आणि भाविकांना सूचना देत तपासणी मोहिम राबवली. पण मंदिरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे बॉम्ब ठेवल्याची बातमी ही केवळ अफवा असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पोलिसांनी निनावी फोन नंबरच्या लोकेशनचा तपास करत दोनजणांना अटक केली.

आंबाबई मंदिरात घातपात होणार असल्याचा फोन करणाऱ्या दोघा जणांच्या कोल्हापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेले दोघंजण हे सासरा आणि जावई आहेत. सासरा बाळासो कुरणे आणि जावाई सुरेश लोंढे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी  कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव मधले आहेत. धक्कादायक म्हणणे दारुच्या नशेत सासऱ्याचा फोन जावायाने वापरून आंबाबई मंदिरात घातपात होणार असल्याचा फोन केला होता.