अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, नागपुरमधील NIT कॉलेजवर ईडीचे छापे

अनिल देशमुख यांना ईडीनं आत्तापर्यंत चार वेळा समन्स बजावलं आहे, पण अजून एकदाही अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झालेले नाहीत

Updated: Aug 6, 2021, 04:43 PM IST
अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, नागपुरमधील NIT कॉलेजवर ईडीचे छापे title=

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माहुरझरी इथल्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेजवर ED ने सर्च  ऑपेशन राबवलं. सुमारे अडीच ते तीन तास ईडीची कारवाई सुरू होती. ईडीच्या टीमबरोबर CRPF जवानांची टीम होती. 

साई शिक्षण संस्थेचे हे कॉलेज आहे. इथं काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. या संस्थेत अनिल देशमुख संचालक आहेत. त्यांचे  पुत्र आणि परिवारातील इतर सदस्य पदाधिकारी या संस्थेत एक्झिक्यूटिव्ह कमिटी सदस्य आहेत. 

ईडीने यापूर्वी अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर आणि काटोल इथल्या निवासस्थानी आणि संस्थांवर छापे टाकले होते. त्यावेळी साई शिक्षण संस्थेसोबत काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे धागेदोरे त्यांना मिळाले होते. त्यापार्श्वभूमीवर आज ईडीने अनिल देशमुख यांच्या NIT कॅम्पस कॉलेज परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं. या सर्च ऑपेरेशनमध्ये काही महत्त्वाची कागदपत्र ईडीची टीम घेऊन गेली. 

अनिल देशमुख यांना ईडीनं आत्तापर्यंत चार वेळा समन्स बजावून देखील ते अजूनही चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत.