आंगणेवाडी यात्रा २०१८ - आजपासून रेल्वे बुकिंगला सुरूवात

  जानेवारी महिना सुरू झाला की कोकणवासियांना वेध लागतात ते आंगणेवाडीच्या जत्रेची ! यंदादेखील ही जत्रा २७ जानेवारी २०१८ पासून सुरू होणार आहे. 

Updated: Jan 7, 2018, 09:44 AM IST
आंगणेवाडी यात्रा २०१८ - आजपासून रेल्वे बुकिंगला सुरूवात   title=

मुंबई :  जानेवारी महिना सुरू झाला की कोकणवासियांना वेध लागतात ते आंगणेवाडीच्या जत्रेची ! यंदादेखील ही जत्रा २७ जानेवारी २०१८ पासून सुरू होणार आहे. 

मध्य रेल्वेची खास सुविधा  

 आंगणेवाडीच्या जत्रेला जाणा-या भाविकांसाठी मध्य रेल्वेनं खूषखबर आणाली आहे.  आंगणेवाडीच्या जत्रेनिमित्त विशेष चार फे-या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय.. 

 आजपासून बुकिंग  

 आजपासून या गाड्यांचं बुकिंग सुरु झालंय. एलटीटी आणि सीएसएमटी ते सावंतवाडी  दरम्यान या गाड्या चालवण्यात येणार आहेत.. त्यामुळे भराडीदेवीच्या दर्शनाला जाणा-या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.