Bypoll Election : पुण्यामध्ये 'दिल्लीत गोंधळ, गल्लीत मुजरा'... 10 हजाराची चिल्लर मोजून अधिकारी दमले

10 हजारांची चिल्लर घेऊन उमेदवारी अर्ज भरायला आलेल्या उमेदवाराला पाहून अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या  'दिल्लीत गोंधळ, गल्लीत मुजरा'... (gallit gondhal dillit mujra)या चित्रपटाची आठवण झाली. 

Updated: Feb 7, 2023, 08:32 PM IST
Bypoll Election : पुण्यामध्ये 'दिल्लीत गोंधळ, गल्लीत मुजरा'...  10 हजाराची चिल्लर मोजून अधिकारी दमले title=

कैलास पुरी, झी मीडिया, पुणे :  पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवडची पोटनिवडणूकीवरुन (Chinchwad Bypoll Election) राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या  पोटनिवडणुकीवरून (Maharashtra Assembly By-Election) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)  मतभेद पहायला मिळत आहेत. तर, दुसरीकडे  भाजप मात्र, ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे (maharashtra politics). त्यातच आता अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची लगबग सुरु असतानाच पुण्यात 'दिल्लीत गोंधळ, गल्लीत मुजरा'... (gallit gondhal dillit mujra)या चित्रपटातील रिअल सीन पहायला मिळाला आहे.  डिपॉजीटचे पैसे भरण्यासाठी उमेदवाराने आणलेली 10 हजारांची चिल्लर मोजून अधिकारी दमले. 

मकरंद अनासपुरे यांचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा हा चित्रपट चांगलाच गाजला होता.  या चित्रपटात अभिनेता अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याचं दाखवण्यात आलं होते. त्याचप्राणे आता  चिंचवडची पोटनिवडणूकीत असाच प्रकार पहायला मिळाला आहे.  डिपॉजीटसाठी उमेदवार दहा हजारांची चिल्लर घेऊन आला. 

पिंपरी चिंचवस मध्ये चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (7 फेब्रुवारी) शेवटचा दिवस होता. या वेळी राजू बबन काळे या अपक्ष उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर आणल्याने अधिकाऱ्यांना ती मोजण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. बराचवेळ अधिकारी चिल्लर मोजत बसले होते. चिल्लर मोजता मोजता अधिकाऱ्यांची दमछाक झाली. चिल्लर मोजून झाल्यावर या उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात आला. 

कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं 22 डिसेंबरला निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे  आमदार लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारीला निधन झालं होतं. या दोन्ही आमदारांच्या जागेवर आता पोटनिवडणुक घेण्यात येत आहे.