अमृता फडणवीस यांचं मार्मिक ट्विट, वजनदारांनी आम्हाला हलक्यात...

आजी आणि माजी मुख्यमंत्री यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही एक मार्मिक ट्विट केलंय.  

Updated: May 16, 2022, 01:02 PM IST
अमृता फडणवीस यांचं मार्मिक ट्विट, वजनदारांनी आम्हाला हलक्यात... title=

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey ) यांनी वजनावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना चांगलाच टोला लगावला होता. 'उद्धव ठाकरे म्हणाले, फडणवीसांनी बाबरीवर पाय जरी ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा खाली आला असता. केवढा विश्वास आहे बघा. माझं आजं 102 किलो वजन आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128 किलो इतकं होतं.

उद्धव ठाकरेंना समजेल अशा भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल तर माझा 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझा एफएसआय 2.5 होता", अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरेंच्या टीकेला जोरदार उत्तर दिलं होतं.

आजी आणि माजी मुख्यमंत्री यांच्यात हे शाब्दिक युद्ध सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनीही एक मार्मिक ट्विट करून या वादात उडी घेतलीय.

वज़नदार ने हल्के को,

बस हल्के से ही वज़न से,

कल ‘हल्का’ कर दिया ...

असं ट्विट करून अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

'बाबरी पाडताना ते म्हणतायत शिवसैनिक नव्हते. फडणवीस म्हणतात मी गेलो होतो तिकडे, तेव्हा तुमचं वय काय होतं, काय शाळेच्या सहलीला गेला होतात. चला चला चला अयोध्येला चला. असं काय होतं का?'

'तुमचं वय काय, बोलता काय, तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलंय. देवेंद्र तुम्ही गेला असतात ना तर तुमच्या वजनाने पडली असती. मग लोकांना श्रमच करावे लागले नसते.'