अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवार निश्चित झाल्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रचाराला गती आली आहे. आतापर्यंत कोणतेही एका पक्षाला पूर्ण बहुमत न मिळालेल्या या निवणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे.
17 प्रभागातील 68 जागांसाठी होत असलेली ही निवडणूक आगामी लोकसभा आणि विधानसभेची रंगीत तालीम समजली जाते. आता पर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आतापर्यंत पालिकेमध्ये वरचष्मा राहिलेला आहे. याच कारणाने पालिकेत कधी युती तर कधी आघाडीची सत्ता राहिली. या निवडनिकीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय.
या निवडणुकीत पक्षीय नेतृत देखील बदलल्याचं पाहायला मिळतंय विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखेंकडे काँग्रेसच नेतृत्व, राष्ट्रवादीचं नेतृत्व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे, खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात भाजप निवडणूक लढवत आहे. तर शिवसेनेचं निवडणुकीचं नेतृत्व माजी आमदार अनिल राठोड करत आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून काँग्रेस 25 तर राष्ट्रवादी काँग्रेस 43 जागांवर आपले उमेदवार देणार आहेत. आतापर्यंत दोन अंकी संख्या गाठू न शकणाऱ्या भाजपने पूर्ण 68 उमेदवार दिले आहेत तर शिवसेनेचे 51 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी केडगाव येथे झालेल्या 2 शिवसेना कार्यकर्यांच्या हत्येच मुद्दा या निवणुकीत चर्चेला येईल याचा परिणाम या निवडणुकीवर पहायला मिळेल. सर्वच पक्षांच्या प्रचाराने जोर धरलेला आहे. आगामी काळात मोठमोठ्या सभा होतील. अनेक तंत्र वापरले जातील यातून कोणाचं पारडं जड होत, कोणाला सूर सापडतो आणि कोण सत्ते पर्यंत पोहचतो हेच पाहणं औचुक्याच ठरणार आहे.