शरद पवारांच्या घरासमोर अजित पवारांची घोषणाबाजी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग, या बंगल्यासमोर मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

Updated: Aug 9, 2018, 06:47 PM IST

बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग, या बंगल्यासमोर मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे या आंदोलनाला राष्ट्रनादीचेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार पाठिंबा दिला. अजित पवार यांनी आंदोलकांनी मारलेल्या ठिय्यात ठिय्या मांडला आणि यानंतर आंदोलकांच्या मधोमध उभे राहून 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत आंदोलकांचं लक्ष वेधलं. बारामतीत मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला. (व्हिडीओ खाली पाहा)

मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सर्वच आमदार खासदारांसमोर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण देखील सुटलेले नाहीत.

काही मोबाईल कंपन्यांकडून पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथे मागील बंदच्या वेळी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. दौंड, भोर, बारामती, खेड, शिरूर, जुन्नर आणि मावळ तालुक्यात काही मोबाईल कंपन्यांकडू इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.