पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन करण्याचे अजित पवार यांचे आदेश

मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळून आल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Updated: Jul 10, 2020, 03:34 PM IST
पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन करण्याचे अजित पवार यांचे आदेश title=
संग्रहित छाया

पुणे : मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळून आल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी आज घेतला. कौन्सिल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत पुन्हा लॉकडाऊन करण्याचे आदेश त्यांनी दिले. सोमवारी किंवा मंगळावरपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लाॅकडाऊन होणार कधीपासून करायचे त्याबाबत पुणे महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि विभागीय आयुक्त मिळून निर्णय घेणार आहेत.  

पुणे जिल्ह्यात रात्रीतून १८३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक १ हजार ८०३ रुग्णांची धक्कादायक वाढ असून तर काल दिवसभरात सर्वाधिक ३५ मृत्यू झाला. जिल्ह्यात मृतांचा आकडा ९७९ वर पोहोचला आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत सलग एक हजारांच्या वर कोरोनाबाधित रुग्ण आढळले. काल दिवसभरात ९२६ जणांना डिस्चार्ज दिला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३४ हजार ५८२ इतका पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत १ लाख ८५ हजार ५९९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.जिल्ह्यात ११ हजार ९८२ अॅक्टिव्ह केसेस आहेत.