अजित पवारांचे शिवसेना-भाजपला चिमटे

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना-भाजपला चांगलेच चिमटे काढले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळस या गावात एका खासगी दूध डेअरीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. 

Updated: Oct 29, 2017, 04:50 PM IST
अजित पवारांचे शिवसेना-भाजपला चिमटे  title=

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना-भाजपला चांगलेच चिमटे काढले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळस या गावात एका खासगी दूध डेअरीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. 

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू हवा या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा धागा पकडत त्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतलं. कपटी उपाधी लावल्याने सेनेनं याचा विचार करायला हवा असंही मिश्किलपणे सांगितलं. तर सरकारवर आगपाखड करताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजन फसवी असल्याचं सांगत कर्जमाफीचा पूर्ण बट्ट्याबोळ केल्याचं सांगितलं.