अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग पुलाचे काम गेले वाहून

अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामावरील पिंपळा येथे बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव पावसात वाहून गेल्याने रेल्वेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Updated: Aug 26, 2017, 09:44 PM IST
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग पुलाचे काम गेले वाहून  title=

बीड : अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामावरील पिंपळा येथे बांधण्यात आलेल्या पुलाचा भराव पावसात वाहून गेल्याने रेल्वेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नगर बीड परळी रेल्वेमार्गाचे पंधरा किलोमीटर चे काम पूर्ण झाले आहे. तसेच बीड पर्यंत देखील काम जोरात सुरु आहे.दरम्यान आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे रेल्वेच्या कामावर तयार केलेला पूल पावसाने वाहून गेला आहे. त्यामुळे काम ठप्प झाले आहे.