अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये झालेल्या हिंसाचारात हत्याकांडानंतर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आलीय. अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोडप्रकरणी शिवाजी कर्डीले यांना अटक करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांनाही ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून केडगावात दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. संतापलेल्या शिवसैनिकांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत रास्तारोको केला. काल संपूर्ण अहमदनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
औरंगाबादमध्ये शवविच्छेदन करून हे मृतदेह नगरला आणण्यात आले. त्यानंतर रात्री या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार अरूण जगताप यांनाही अटक करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी पुन्हा एकदा केली. त्यासाठी रात्री पुन्हा रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर केडगावात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या अंत्यसंस्कारांनंतर आज अहमदनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.