राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना घेरुन फवारणीचा प्रयत्न

 शेतीच्या कीटकनाशक औषध फवारणीमुळे १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर ६०० हून अधिकांना बाधा झाली होती. त्यानंतर आज मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आले असता त्यांना शेतकऱ्यांनी घेरले. 

Updated: Oct 4, 2017, 02:42 PM IST
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना घेरुन फवारणीचा प्रयत्न   title=

यवतमाळ : जिल्ह्यात शेतीच्या कीटकनाशक औषध फवारणीमुळे १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर ६०० हून अधिकांना बाधा झाली होती. त्यानंतर आज मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आले असता त्यांना शेतकऱ्यांनी घेरले. यावेळी त्यांच्यावर पंपाच्या माध्यमातून फवारणीचा प्रयत्न  झाला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यवतमाळच्या शेंदूरसनी गावाला भेट दिली आणि शेतात जाऊन पिकांचीही पाहणी केली. याचदरम्यान, शेतकरी प्रतिनिधींचा घेराव घालून आपला संपात व्यक्त करत जाब विचारला. यावेळी फवारणी पंपातून त्यांच्यावर फवारणीचा प्रयत्न झाला. तसेच सरकारविरोधात घोषणा करण्यात आल्या. खोत हाय हायच्या घोषणाही देण्यात आल्यात.

सिकंदर शहा या शेतकऱ्यानेफवारणी करण्याचा प्रयत्न केला. शहा शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  सदाभाऊ खोत यांची दीपक मडावी या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेट घेतली. कीटकनाशक फवारणीने  दीपक मडावी यांचा मृत्यू झाला.