मुंबई : नाशिकचे महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांना उच्च न्यायालयानं चांगलाच दणका दिलाय आहे. न्यायालयानं स्थगिती दिली असतानाही महापालिकेनं अनधिकृत लॉन्स पाडण्याची कारवाई केली होती. त्याविरोधात नाराज लॉन्समालकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर, न्यायालयानं मुंढेंना चांगलंच खडसावलं. स्थगिती असताना महापालिकेनं केलेली कारवाई बेकायदेशीर असून, पाडलेले लॉन्स पुन्हा बांधून द्या, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. एवढंच नव्हे तर किती पाडलेली लॉन्स पुन्हा बांधली, याची माहिती १६ जूनपर्यंत द्या, असंही न्यायालयानं बजावलं आहे.
लॉन्समालकांवर कारवाई केल्यानंतर लॉन्मालकांनी घेतली हायकोर्टात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर कोर्टाने हा सवाल केला होता. दोन दिवसांची स्थगिती दिली असतांनाही लॉनसवर कारवाई करण्यात आली होती. या सुनावणी दरम्यान इतर अधिकारी उपस्थित होते पण आयुक्त मुंढे उपस्थित नसल्याने कोर्टाने खडेबोल सुनावले आहे.आज तीन वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.
नाशिक महापालिकेत सध्या बदल्यांचा धडका सुरू आहे. धडकेबाज आयुक्त तुकाराम मुंढेंनी आज मनपाला २२ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या केल्यात. याशिवाय वैद्यकीय विभागातील ८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहे. प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलाय. याशिवाय राजकीय दबाव सहन केला जाणार नाही, असंही मुंढेंनी स्पष्ट केलंय..