डिजिटल देशात... 'भूत' दिसलं आणि नाट्यगृहाचं काम थांबलं!

पिंपरी-चिंचवडमध्ये आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचं काम सुरू आहे. बांधकाम सुरू होतं... पण, गेली दहा दिवस तिथल्या कामगारांनी हे काम बंद केलं. त्याचं कारण ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसेल...

Updated: Mar 15, 2018, 10:25 AM IST
डिजिटल देशात... 'भूत' दिसलं आणि नाट्यगृहाचं काम थांबलं! title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचं काम सुरू आहे. बांधकाम सुरू होतं... पण, गेली दहा दिवस तिथल्या कामगारांनी हे काम बंद केलं. त्याचं कारण ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसेल...

शू... कुणीतरी आहे!

पिंपरी चिंचवडमधल्या आचार्य अत्रे नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचं सध्या काम सुरू आहे. पण सध्या इथे विचित्रच दहशत पसरलीय... ही दहशत आहे भूताची... काही दिवसांपूर्वी रात्री कामगार इथं काम करत होते... त्यावेळी अचानक वारा सुटला आणि मोठमोठ्यांदा मारण्याचे आवाज येऊ लागले. लाकडाचा सांगाडा हलू लागला... इथं भूत दिसल्याचाही दावा एका कामगारानं केलाय. त्यामुळे इतर कामगारांनी इथे काम करणं बंद केलं.

पूजा, होम-हवन... आणि बरंच काही!

कामगारांना भूत दिसल्यानंतर तब्बल दहा दिवस आचार्य अत्रे नाट्यगृहाचं काम बंद होतं. अखेर या कामगारांनी भटजी बोलावून इथे पूजा, होम-हवन करुन घेतली... आणि मग काम सुरू केलं... पण आताही संध्याकाळी पाचनंतर कामगार इथे काम करत नाहीत. 

डिजिटल आणि महासत्ता बनायला निघालेल्या आपल्या देशात अंधश्रद्धा किती खोलवर रुजलीय, हेच यातून पुढे आलंय.