अभिजीत बिचुकलेची कळंबा कारागृहात रवानगी

  अभिजित बिचुकले याची कोल्हापूरमधील कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Updated: Jun 25, 2019, 12:10 PM IST
अभिजीत बिचुकलेची कळंबा कारागृहात रवानगी title=

कोल्हापूर : खंडणीप्रकरणी अभिजीत बिचुकले याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची कोल्हापूरमधील कळंबा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चेक बाऊन्सप्रकरणी जामीन मिळालेल्या आणि २०१२ मधील खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या 'बिग बॉस' या रिअॅलिटी स्पर्धेचा सदस्य अभिजित बिचुकले याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. बिचुकले याचा शनिवारी पहाटे रक्तदाब वाढल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्याची तपासणी करून तो फिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सकाळी ११ वाजता त्याला न्यायालयात हजर केले.

यावेळी न्यायालयाने बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर केला. मात्र, २०१२ मध्ये फिरोज पठाण यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही बिचुकले हा न्यायालयात हजर राहीला नव्हता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. अभिजीत बिचुकलेवर आणखी काही गुन्हे आहेत का ? याची पडताळणी केली असता खंडणी प्रकरणात त्याला वॉरंट बजावले असल्याचे समोर आले. त्यामुळेच त्याची रवानगी जिल्हा रुग्णालयातील कोठडीत करण्यात आली होती.

दरम्यान काल सोमवार संध्याकाळी त्याला जामीन मिळेल अशी अशा होती. मात्र या खटल्याची पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो फिट असल्याचेसांगितले. त्यानंतर संध्याकाळी त्यांची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात रवानगी केली गेली.