Kusti : बाईनं मैदान गाजवलं! महिलेने केले पुरुष कुस्तीपटूला चितपट

Kusti : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथे श्री दरलिंगेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका एका महिला कुस्ती पटूने पुरुष मल्लास चितपट केले . मोनिका भागवत बिडगर असे या कुस्तीपटूचे नाव आहे.

Updated: Apr 8, 2023, 08:25 PM IST
Kusti : बाईनं मैदान गाजवलं! महिलेने केले पुरुष कुस्तीपटूला चितपट title=

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी :  सध्या गावोगावी जत्रा सुरु आहेत. या निमित्ताने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यापैकी कुस्तीच्या (Kusti) स्पर्धा सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत. परभणीत (Parbhani) पार पडलेली कुस्तीची स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे. येथे एका बाईनं मैदान गाजवल आहे. महिला कुस्तीपटूने पुरुष कुस्तीपटूला चितपट केले आहे. 

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथे श्री दरलिंगेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका एका महिला कुस्ती पटूने पुरुष मल्लास चितपट केले . मोनिका भागवत बिडगर असे या कुस्तीपटूचे नाव आहे.

मोनिका या  गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील आहेत. मोनिका यांचा सामना मालेवाडीच्या यात्रेत पुरुष कुस्ती पट्टू सोबत लावला होती.  पुरुष कुस्तीपट्टूला चितपट केल्याने उपस्थितांनी मोनिकाचे कौतुक केले. या सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

पावसात रंगली कुस्त्यांची दंगल

अवकाळी पावसाच्या सरी अंगावर झेलत कुस्तीच्या आखाड्यात दोन मल्ल एकमेकांना भिडले. नांदगावच्या न्यायडोंगरीमध्ये हे चित्र  पाहायला मिळाले. हनुमान जयंती निमित्त  ग्रामस्थांनी कुस्त्यांची विराट दंगल आयोजित केली होती. या कुस्त्यांसाठी नेपाळ येथील राष्ट्रीय मल्ल देवेन थापा आणि उत्तराखंड येथील सावेज पहिलवान यांची उपस्थिती कुस्ती शौकिनांसाठी खास पर्वणी ठरली. ही कुस्ती बघण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमींनी  गर्दी केल्याने आखाडा गर्दीने फुलून गेला होता.

भर पावसात भारत केसरी सिकंदर शेख आणि इराणच्या पैलवानात कुस्तीचा थरार

सांगलीच्या कुरळपमध्ये भर पावसात भारत केसरी सिकंदर शेख आणि इराणच्या पैलवानात कुस्तीचा थरार रंगला. या कुस्तीत सिकंदर शेखनं इराणच्या अली मेहरी याला चितपट केलं.कुरळपच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये सुमारे 100 हून अधिक कुस्त्या पार पडल्या. अंतिम लढत सिकंदर शेख आणि अली मेहरी यांच्यात झाली. कुस्ती सुरू होताच विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. या पावसात 3 मिनिटे अंतिम कुस्तीचा थरार सुरूच होता. अखेर सिकंदर शेखनं आली मेहरीला चितपट केलं. विजेत्या सिकंदर शेखला चार लाखांचं रोख बक्षीस, बुलेट गाडी आणि हनुमान केसरी किताब देऊन गौरवण्यात आलं.