पुण्यात महिलेची गोळी घालून हत्या

 इंद्रायणी सोसायटीमधली धक्कादायक घटना

Updated: Nov 21, 2018, 05:40 PM IST
पुण्यात महिलेची गोळी घालून हत्या title=

पुणे : पुण्याच्या चंदननगरमधल्या आनंदपार्कमध्ये एका महिलेची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. इंद्रायणी सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अनुजा भाटी असं मृत महिलेचं नाव आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र हा हल्ला का करण्यात आला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

अनुजा भाटी यांचा वडगाव शेरी परिसरात कॅटरिंगचा व्यवसाय होता. इथल्या अनेक सॉफ्टवेयर कंपनीमध्ये त्या डबे पोहोचवायच्या. ही घटना घडली तेव्हा पती ब्रिजेश भाटी हे घरातच होते. मूळचं नोएडाच असलेलं हे कुटुंब दोन वर्षांपासून पुण्यात व्यवसायासाठी राहत असल्याची माहिती आहे. सुरुवातीला पतीनेच गोळीबार केल्याची माहीती पुढे आली होती. त्यानंतर आता दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. चंदननगर पोलीस याबाबत आणखी तपास करत आहेत.